Skip to main content

स्वरूपयोगाश्रम

स्वरूपयोगाश्रम सर्व आध्यात्मिक साधकांसाठी खुला आहे. तुम्ही या पेजवर दिसलेल्या इमेजवर क्लिक करून पुढील एक्सप्लोर करू शकता. आश्रमाची दिशा येथे क्लिक करून मिळू शकते

संकल्पना
मनुष्याला निसर्गतःच शांती आणि समाधानाची एक आंतरिक ओढ जाणवत असते. अंतरातील समाधान विकसित करायचं असेल तर त्याचा शोध अंतरातच घ्यायला हवा. हाच ईश्वराचा शोध! या स्व-संशोधनाच्या मार्गावर ध्यानयोगाच्या साहाय्याने भरारी घेण्यासाठी जिथे योगमार्गाची अचूक शिकवण देता येईल अशी निसर्गरम्य, शांत आणि पवित्र वास्तू असावी या स्वामी माधवानंद यांच्या संकल्पनेतून पुण्याहून अवघ्या तासाभराच्या अंतरावर, मावळात, गिरिवन प्रकल्पाच्या अंतर्गत, शिवम डोंगराच्या कुशीत साकारलेलं, आपल्या प्राचीन गुरु-शिष्य परंपरेची मूल्यं पुनरुज्जीवित करणारं स्वप्न म्हणजेच स्वरूपयोगाश्रम!

आगामी शिबीरे
स्वरूपयोगाश्रम सर्व साधकांसाठी नित्य खुला करण्यात आहे. खाली नमूद केलेल्या कुठल्याही दूरध्वनीवर संपर्क करून, पूर्व कल्पना व परवानगी घेऊन आपण ध्यानसाधना व उपासनेसाठी येऊ शकता. स्वरूपयोग प्रतिष्ठान दरवर्षी डिसेम्बर ते एप्रिल या काळात अध्यात्म-शिबिरे आयोजित करते. त्याशिवाय महाशिवरात्री, रामनवमी यांसारखे विशेष उत्सव तेथे साधना करून साजरे केले जातात. आगामी शिबिरांच्या तारखा वेळोवेळी कळवण्यात येतील.
संपर्क: स्वरूपयोग कार्यालय दूरध्वनी - +91-02025652457
श्री. जयंत आपटे - +91-9423267725
श्री. चैतन्य देशपांडे - +91 9011013819